योगेश्वरी मराठे हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:38+5:302021-09-02T04:36:38+5:30
चाळीसगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील योगेश्वरी अनिल मराठे हिची ६२ किलो वजन गटात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड ...

योगेश्वरी मराठे हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
चाळीसगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील योगेश्वरी अनिल मराठे हिची ६२ किलो वजन गटात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. ती एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची खेळाडू आहे.
कुस्ती कोच भानुदास सारखे, अनिल मराठे, दिलीप सोनवणे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. ॲडव्हाेकेट किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरसेवक प्राध्यापक मनोज पाटील, सुनील देशमुख, नितीन चौधरी यांनी तिचे अभिनंदन केले. गुरु हनुमान कुस्ती के संस्थेचे उपाध्यक्ष पंकज पाटील, अनिल पारखे, नयना आरखे, अनिल भोई, एस. पाटील, दिलीप पाटील, दुर्गादास वानखेडे, महाजन, संभाजी देसले, राजू साडी यांनी तिचे अभिनंदन केले.
फोटो कुस्तीगीर योगेश्वरी मराठे