लायनेसतर्फे योगा प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST2021-01-16T04:19:25+5:302021-01-16T04:19:25+5:30

जळगाव : ओजस आयुर्वेद, डॉक्टर महेश बिर्ला आणि लायनेस क्लब यांनी तीनदिवसीय योगा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या ...

Yoga training camp by Lions | लायनेसतर्फे योगा प्रशिक्षण शिबिर

लायनेसतर्फे योगा प्रशिक्षण शिबिर

जळगाव : ओजस आयुर्वेद, डॉक्टर महेश बिर्ला आणि लायनेस क्लब यांनी तीनदिवसीय योगा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात योगा शिक्षकांना सुरत येथील दिशा महेश्वरी यांनी योगा, मुद्रा आसन, मेडिटेशन, प्राणायाम, कुंडलिनी जागरण यांचे प्रशिक्षण उपस्थित महिला, पुरुष आणि तरुणांना दिले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सीकची यांनी ‘कोविड लस अफवा आणि सत्यता’ यावर अभ्यासपूर्ण विवेचन करून ही लस आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन केले. लायनेस सचिव अलका कांकरिया यांनी दिशा महेश्वरी तसेच डॉक्टर महेश बिर्ला यांचे स्वागत व आभार मानले. याचवेळी योगा अभ्यासाचे शिबिरार्थी कंवरलाल संघवी व अनिता कांकरिया यांनी मनोगत केले. यशस्वीतेसाठी डॉक्टर अर्चना बिर्ला, प्रीती जैन, विजया बाफना, सोनाल जैन, दीपा कांकरिया व ओजस टीमचे सहकार्य मिळाले.

Web Title: Yoga training camp by Lions