शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

योग : आनंदी जीवनाचा राजमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:05 IST

योगासन व प्राणायाम हा भारतीय वारसा

जळगाव : योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो आणि आजार, विकारांचे निवारण होण्यास खूप मदत होते. एक प्रकारे आनंदी जीवनाचा राज मार्ग म्हणजे योगा आहे. अख्या जगानेही स्वीकारलेल्या या विद्येचा आपल्या देशातही अधिकाधिक प्रचार, प्रसार होऊन सर्वांना निरामयी आरोग्य जगता येईल, असा विश्वास योग दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वीची ही योगसाधना म्हणजे पतंजली ऋषींनी जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योगसाधनेची आठ अंगे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. योगसाधनेने शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या चार स्तरावर समतोल विकास होतो, असा सल्ला योग तज्ज्ञांकडून दिला जात आहे. योग दिनानिमित्त घेतलेला हा आढावा....सूर्यनमस्कारभारतभूमीने जगाला दिलेल्या मौलिक देणग्यांमध्ये योगविद्या, ओंकारसाधना आणि सूर्यनमस्कार यांचा समावेश आहे. पायाच्या टाचेपासून तर मानेच्या मणक्यापर्यंत व श्वसनविषयक हा व्यायाम अनेक शतकांपासून साधकांचा प्रिय व्यायाम प्रकार राहिला आहे. सूर्यनमस्कारात जानुभालासन, अर्धभुजंगासन, अष्टांगासन, सरलहस्त भुजासन, अधोमुख श्वासासन यांचा समावेश आहे. सूर्यनमस्कार घालताना सूर्यदेवतेची नावे मोठ्याने उच्चारताना ‘रकारान्त’ बाराखडी ही मंत्रसामर्थ्य व शक्तीप्रदान करणारी ठरते.ओंकार साधनेचे फायदेदीर्घ श्वसनामुळे फुफ्फुसे कार्यक्षम राहातात, रक्ताभिसरण वाढून शरीराला अधिक प्राणवायू मिळतो, त्यामुळे प्रसन्नता, उत्साहवृद्धी होते. रक्तदाब नियंत्रणात राहातो. निद्रानाश दूर होतो. स्मृतिसंवर्धन होते. स्वरयंत्रावर चांगला परिणाम होतो. विशेषत: स्वरसौंदर्य वाढण्यास मदत होते. शास्त्रीय गायक-गायिकाही ओंकारसाधनेद्वारे आपल्या आवाजाची गुणवत्ता वाढवतात, असे योगतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रोग प्रतिबंधात्मक उपाययोग ही शांती, समाधान, आनंद देणारी साधना असून त्यामुळे निरोगी जीवन जगता येऊ शकते. रोग झाल्यावर योग करण्यापेक्षा रोग होऊच नये यासाठी योग करावा. म्हणजेच योग हा रोग प्रतिबंधात्मक उपायच असल्याचा सल्लाही दिला जात आहे.शारीरिक, मानसिक विकासासाठी सोपा उपाय२१ जून आज जागतिक योग दिवस. शारीरिक व मानसिक विकासासाठी योगासन हा एकच उत्तम व बिनखर्चिक उपाय आहे. तसेच योग ही एक जीवन शैली असून दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला तर स्वत:सह सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यास मदत होईल. शालेय शिक्षणातही योगाचा समावेश झाल्यास मुलांना लहान पणापासूनच त्याचे महत्त्व समजेल, ते जागृत होतील. योगामध्ये आता करिअरच्या वाटादेखील निर्माण झाल्या असून इतर क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना विद्यार्थ्यांना यामध्ये चांगली संधी आहे, अशी माहिती योग दिनानिमित्त दिली जात आहे.लहान वयापासूनच योगाची सुरुवात व्हावीआधुनिक जीवन शैलीत निरोगी आरोग्यासाठी योग अभ्यास आवश्यक आहे. यामुळे मानसिक, शारीरिक व्याधी दूर होतात. लहान वयापासूनच याची सुरुवात झाली पाहिजे, असा सूरही उमटत आहे.निरामयी जीवनाचा मंत्र....- रोज श्वसन, प्राणायाम, आसन, सूर्यनमस्कार व पूरक हालचाली असा व्यायाम करा- अनेक योगासनांचा संगम म्हणजे सर्वांगसुंदर व्यायाम.- योग एक जीवन शैली आहे, तिचा उपयोग करा.- योग प्राचीन शास्त्र असून यामुळे आनंदी जीवन जगता येते.योग ही शांती, समाधान, आनंद देणारी साधना असून त्यामुळे निरोगी जीवन जगता येऊ शकते. योग ही अवघ्या विश्वाला भारतीय संस्कृतीने दिलेली देणगी आहे. तिची जोपासना झाली पाहिजे. त्यासाठी जनाजनात व मनामनात योग रुजविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.- प्रा. आरती गोरे, संचालक, सोहम् डिपार्टमेंट आॅफ योग अ‍ॅण्ड नॅचरोपॅथी, मू.जे. महाविद्यालय.

टॅग्स :Jalgaonजळगाव