विविध शाळांमधे योग दिनाचे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:15+5:302021-06-26T04:12:15+5:30
भुसावळ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तालुक्यातील शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर, विद्यार्थ्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी ऑनलाइन योग प्राणायाम अभ्यास आपल्या ...

विविध शाळांमधे योग दिनाचे कार्यक्रम
भुसावळ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तालुक्यातील शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर, विद्यार्थ्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी ऑनलाइन योग प्राणायाम अभ्यास आपल्या घरातच बसून केला.
के. नारखेडे विद्यालय भुसावळ येथे विद्यालय प्रांगणात योग दिन साजरा झाला. मुख्याध्यापक एन.बी. किरंगे यांच्या उपस्थितीत उपमुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक रमण भोळे, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयाचे मास्टर ट्रेनर उपस्थित होते. शिक्षिका एस.पी. पाठक यांनी योगासंबंधित संस्कृत श्लोक व त्यांचा अनुवाद विशद केला. याप्रसंगी विविध आसने करण्यात आली. पर्यवेक्षक झोपे, पर्यवेक्षक एस. एल. राणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय साकेगाव, दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव, महात्मा ज्योतिबा फुले व प्राथमिक विद्यामंदिर कंडारी,सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालय कंडारी, श्री शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, दीपनगर के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ, एन. के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, श्री गाडगेबाबा हायस्कूल भुसावळ, आर. एस. आदर्श हायस्कूल भुसावळ, श्री देवकरण लक्ष्मीनारायण हिंदी विद्यालय भुसावळ, सेंट अलॉयसिस हायस्कूल भुसावळ, अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ, बी. झेड. उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भुसावळ इत्यादी शाळांनी योगा दिनानिमित्त सहभाग नोंदविला.