योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:58+5:302021-06-22T04:11:58+5:30
जाणता राजा प्रतिष्ठान संचालित के.के. इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी झूम मीटिंगच्या ...

योग दिन
जाणता राजा प्रतिष्ठान संचालित के.के. इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी झूम मीटिंगच्या माध्यमातून योगासनांचे प्रात्यक्षिक केले, तर शिक्षकांनी प्रत्येक योगासनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना योगासन कसे करायचे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका वैशाली पंडित, संचालक मनोज पाटील व सीमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील उपस्थित होते.
------------
सरस्वती विद्यामंदिर
सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गिरीश महाजन, तुषार पवार यांनी योगाचे प्रात्यक्षिक करत सर्व शिक्षकांकडून योगा करून घेतला. त्यानंतर सुवर्णलता अडकमोल यांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतली. यामध्ये इयत्ता दुसरी श्रवण खिरडकर या विद्यार्थ्याने उत्कृष्टपणे योगा सादर केला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष मनोजकुमार पाटील, कल्पना वसाणे व दीपाली देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
------------
विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम पूर्व प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाइन पद्धतीने आणि व्हिडीओद्वारे साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रमुख अश्विनी डहाळे, प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील आणि माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे, संगीत शिक्षक भूषण खैरनार, डॉ. कांचन विसपुते, दीपश्री कोळी, क्रीडा शिक्षक मुकुंद शिरसाठ आणि दीपक बनसोडे उपस्थित होते.
--------------
प्रगती विद्यालय
ऑनलाइन पद्धतीने प्रगती बालवाडी, प्रगती विद्यामंदिर व प्रगती माध्यमिक शाळेत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, शिक्षक सुभाष शिरसाठ, मुख्याध्यापक शोभा फेगडे, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वाघ तर आभार भाग्यश्री तळेले यांनी मानले.
-----------------
शानभाग विद्यालय
ब.गो. शानभाग विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, विभाग प्रमुख जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील, अंजली महाजन, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील, रवींद्र सैंदाणे तर दुपार विभागात विवेकानंद प्रतिष्ठानचे क्रीडा समन्वयक सूर्यकांत पाटील, संजय यादव, अजय काशीद यांनी महत्त्व समजावून सांगितले.
------------
बीयूएन रायसोनी स्कूल
बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये योग शिक्षक मुकेश परदेशी, मुख्याध्यापिका नलिनी शर्मा, विठ्ठल पाटील, मनोज शिरोळे यांनी सर्वांना योग दिनाविषयी माहिती दिली. यश दांडेकर, खुशी लोहिया, कावेरी सुरवाडकर, युक्ती काबरा, वेदिका वधाने या विद्यार्थ्यांनीदेखील योग दिवसाचे महत्त्व सादर केले.
---------------
सीताबाई भंगाळे विद्यालय
युवा विकास फाउंडेशन संचालित सीताबाई भंगाळे माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात ऑनलाइन योग दिन साजरा झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, विजया चौधरी, अनुपमा कोल्हे, सचिन महाजन, दीपनंदा पाटील, स्वाती पगारे, दीपक भारंबे, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भूषण भोळे आदींची उपस्थिती होती.
-----------------