जळगावात जुगार अड्डय़ावर धाड; सहा जणांना अटक

By admin | Published: May 19, 2017 01:14 AM2017-05-19T01:14:03+5:302017-05-19T01:14:03+5:30

सम्राट कॉलनी : पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई

Yield on gambling in Jalgaon; Six people arrested | जळगावात जुगार अड्डय़ावर धाड; सहा जणांना अटक

जळगावात जुगार अड्डय़ावर धाड; सहा जणांना अटक

Next

जळगाव : पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 9 वाजता जळगावातील सम्राट कॉलनीतील जुगार अड्डय़ावर धाड टाकली. त्यात सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 हजार 640 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
 उपअधीक्षक यांच्या पथकाकडून अचानकपणे राबविण्यात येत असलेल्या धाडसत्रामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.
सम्राट कॉलनीत मनपाच्या घरकुलाच्या आडोश्याला लागून जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार उपअधीक्षक सांगळे यांच्याकडे आली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील उपनिरीक्षक अशोक वानखेडे, अनिल पाटील, विजय काळे, संदीप भिकन पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने राबविलेल्या धाडसत्रात भरत दिलीप बाविस्कर (वय , रा.सम्राट कॉलनी, जळगाव), जितेंद्र युवराज भावसार (वय 22, रा.सम्राट               कॉलनी), सुनील पुंडलिक तायडे (वय 42, रा.विसनजीनगर, जळगाव), अमजद शहा रशिद शहा (वय 29, रा.रझा कॉलनी, जळगाव),                                   मंगेश रामकृष्ण वाणी (वय 38, रा. जोशी पेठ, जळगाव) व सलमान              शेख करीम (वय 23 रा. तांबापुरा, जळगाव) आदी जण जुगार खेळताना आढळून आले. या वेळी काही जण फरार झाले.

Web Title: Yield on gambling in Jalgaon; Six people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.