शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

होय! मुंबईतील गर्दीमुळे आता आमचाही जीव गुदमरतोय - आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे पणतू सुरेंद्र शेठ यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:07 IST

ज्यांनी भारतात रेल्वे आणली, त्यांचाच रेल्वेला विसर पडला, ‘मुंबई सेंट्रल’ला नानांचे नाव देण्याची अपेक्षा

विहार तेंडुलकरजळगाव : नाना शंकरशेठ यांनी मुंबईची निर्मिती केली, पण आज दुर्दैवाने मुंबईत आमचीही घुसमट होऊ लागलेय. मी गिरगावात राहतो, तेथे एवढी गर्दी आहे की, बाहेर पडलो तरी जीव घुसमटून जातो, अशी खंत आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे पणतू सुरेंद्र विनायक शंकर शेठ यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.नानांची सोमवारी २१८वी जयंती होती. त्यानिमित्त जळगावात एका कार्यक्रमासाठी आले असताना, त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न : नानांनी भारतात रेल्वे आणली, आज रेल्वेचे जाळे अखंड भारतात पसरले आहे..उत्तर : हो! पण दुर्दैवाने आज एकाही स्थानकाला नानांचं नाव नाही. ‘व्हीटी’ला त्यांचं नाव द्यावं, अशी आमची मागणी होती. पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडली. आता मुंबई सेंट्रलला नानांचं नाव द्यावं, अशी आमची मागणी आहे. आम्ही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही भेटलो. त्यांनी हिरवा कंदील दिला आहे. पुढील दोन आठवड्यात राज्य मंत्रिमंडळासमोर असा प्रस्ताव संमत होईल, अशी आशा आहे. आमची मागणी आहे की, नानांनी त्यांच्या संपत्तीचा त्याग करून रेल्वे आणली, त्यांची ओळख कुठेतरी निर्माण व्हावी, पुढील पिढीला नानांचं कार्य समजावं.प्रश्न : मुंबईचे जगणं आता हाताबाहेर चाललं आहे. अनेक प्रश्नांची जननी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते, हे पाहिल्यावर काय वाटतं?उत्तर : मुंबईचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. आता लोकल लोक मुंबई सोडून चाललेत आणि बाहेरून येणाऱ्या लोकांनीच मुंबई भरून गेली आहे. बाहेरून येणाºया कुणालाही मुंबईची दारे बंद व्हावीत, अशी आमची भूमिका नाही. तेही भारताचेच सुपुत्र आहेत. पण त्याला मर्यादा असावी. आता मुंंबईत जीव घुसमटू लागलाय.प्रश्न : नानांच्या कार्याचा प्रसार होण्यासाठी कुुटुंबिय म्हणून आपले काही प्रयत्न आहेत का?उत्तर : वडाळ्याला नानांचं स्मारक बांधण्यात येत आहे. त्याचे भूमीपूजनही झाले आहे. त्यासाठी थोडी निधीची आवश्यकता आहे. दानशूर लोकं पुढे येत आहेत. याठिकाणी केवळ शैक्षणिक उपक्रम राबवले जातील आणि त्यातून निर्माण होणारा निधी हा गरजू लोकांसाठी वापरला जाईल.रेल्वेकडून याबाबत सकारात्मक निर्णय का होत नाही?नानांनी भारतात रेल्वे आणली. ज्यावेळी लंडनमध्ये त्यांनी रेल्वे पाहिली, त्यावेळी त्यांनी ब्रिटीश सरकारकडे विनंती केली. ती मान्य झाली अन् मुंबईत रेल्वेच्या कामाला गती मिळाली. रेल्वेच्या त्यावेळच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरमध्ये पाच सदस्य होते. तीन ब्रिटीश दोन भारतीय. भारतीयांमध्ये एक जमशेदजी जीजीभाई व नाना शंकरशेठ. नानांनी व्हीटी स्टेशनच्या कार्यालयासाठी स्वत:ची जागाही दिली. एवढेच नाही तर हा प्रकल्प उभारणीसाठी निधीही दिला. मुंबईचा कारभार पूर्वी ज्या टाऊनहॉलमधून चालायचा, त्याची उभारणीही नांनांनी केली. अशा सत्पुरुषाचे नाव रेल्वे स्थानकाला द्यावे, असे आजपर्यंत कोणालाच वाटले नाही.नानांच्या नावे शैक्षणिक उपक्रमनानांनी स्टुडंट लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी ही पहिली शैक्षणिक संस्था काढली. ज्या संस्थेत जमशेदजी टाटांसारखे उद्योजक होते. त्यांनी संस्कृत स्कॉलरशिप सुरु केली. कारण संस्कृत हा त्यांच्या आवडीचा विषय होता. आजही दहावी परिक्षेत संस्कृतमध्ये प्रथम येणाºया विद्यार्थ्याला ती दिली जाते. नानांनी गिरगावात मुंलीसाठी पहिली शाळा सुरु केली अन् तीही मोफत!

 

टॅग्स :Jalgaonजळगाव