यंदाही पुराचा धोका कायम

By Admin | Updated: May 20, 2017 00:49 IST2017-05-20T00:49:12+5:302017-05-20T00:49:12+5:30

चहार्डी : वर्षभरात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही

This year the risk of floods still remains | यंदाही पुराचा धोका कायम

यंदाही पुराचा धोका कायम

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथे असलेल्या कोल्हापुरी बंधा:यामुळे गेल्या वर्षी अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्या वेळी भेटीसाठी आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी बंधा:याची उंची कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या वर्षाचा पावसाळा सुरू होण्याची वेळ आली तरी बंधा:याची उंची कमी झाली नाही की पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. दरम्यान, यंदाही  चहार्डीवासीयांना पुराचा धोका कायम आहे.
चहार्डी येथे 90 लाख रुपये खचरून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. मात्र त्यात अद्याप थेंबभरही पाणी अडलेले नाही. अजूनही बंधारा हस्तांतरणाच्या लालफितीत  अडकलेला आहे. लघुसिंचन विभागाने आमच्या ताब्यात अजूनही बंधारा हस्तांतरित केला नसल्याचे  ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. तर  बंधारा ग्रामपंचायतच्या ताब्यात दिल्याचे लघुसिंचन विभागाचे म्हणणे आहे.
या दोघांच्या वादात बंधा:यात पाणी तर अडविले गेलेच नाहीच, उलट बंधा:यात कचरा अडकून पावसाळ्यात तेथील पाणी गावात शिरते. गेल्या वर्षी 9 जून 2016 रोजी झालेल्या पावसामुळे बंधा:यातील पाणी गावात शिरले होते. त्यामुळे  अनेकांचे संसार या पाण्यात वाहून गेले होते. त्या वेळी पाहणीसाठी आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी बंधा:याची उंची कमी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी बंधा:याची उंची कमी झालीच नाही, शिवाय नुकसानग्रस्तांनाही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे खासदारांचे आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा आहे.

Web Title: This year the risk of floods still remains