यावल येथे संगीतमय श्रीमद ्भागवत सप्ताहातील सजीव देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 20:16 IST2018-12-17T20:13:47+5:302018-12-17T20:16:14+5:30

यावल येथील श्री स्वामिनारायण परमधाम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्ताने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत सजीव देखाव्यांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध होत करीत आहे.

Yaval's musical Srimad Bhagwat Weekly Enchanted Weekly Moods | यावल येथे संगीतमय श्रीमद ्भागवत सप्ताहातील सजीव देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध

यावल येथे संगीतमय श्रीमद ्भागवत सप्ताहातील सजीव देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध

ठळक मुद्देशिवशंकरजींच्या भूमिकेनेही वेधले लक्षस्वामिनारायण मंदिरात सुरू आहे प्राणप्रतिष्ठा महोत्सव

यावल, जि.जळगाव : येथील श्री स्वामिनारायण परमधाम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्ताने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत सजीव देखाव्यांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध होत करीत आहे. शनिवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव, तर रविवारी शिवतांडव सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते.
शहरातील भुसावळ रस्त्यावरील बोरोले नगरात श्री स्वामिनारायण परमधाम मंदिरात प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा केला होत आहे. त्यानिमित्ताने संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे. कथेतील विविध घटना सजीव साकारले जात असल्याने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. शनिवारी कथेतील श्रीकृष्ण जन्माचा सजीव देखावा सादर करण्यात आला. त्यात वासुदेवांची भूमिका प्रदीप महाजन, नंदबाबाची भूमिका अमोल भिरूड, यशोदामाताची भूमिका गौरी भिरूड, श्रीकृष्णाची भूमिका ओम भूषण पाटील, तर गवळणीचे पात्र पायल पाटील, भाग्यश्री वारके, वर्षा चोपडे, गायत्री पाटील, पूजा फालक, जागृती फालक, लक्ष्मी महाजन, हर्षा जावळे यांनी साकारले होते, तर रविवारी कथा शिव तांडवाच्या सजीव देखाव्याने तर भाविकांनी लक्ष वेधले. त्यात शिवशंकरजींचे पात्र दीपक फेगडे, नंदजी पंकज फिरके तर भुतांचे पात्र आकाश कोळंबे, हेमंत फेगडे, प्रशांत फेगडे यांनी उत्तमरित्या साकारले.
रूख्मिणी विवाह
कथा मंडपात भक्तीकिशोरदासजी शास्त्री यांच्या संचलनात संगीतमय श्रीमद् भागवत कथा भक्तीप्रकाशदासजी (वेदांत व्याकरणाचार्य) सादर करत आहे, तर सोमवारी सायंकाळी रूख्मिणी विवाह पार पडला.

 

Web Title: Yaval's musical Srimad Bhagwat Weekly Enchanted Weekly Moods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.