यावल : येथील न्यायालयाचे प्रथम वर्ग दिवानी न्यायाधिश डी. जी. जगताप यांना गुरूवारी निलंबीत करण्यात आल्याने शुक्रवारी त्यांच्या न्यायालयाचे कामकाज बंद राहिले. आलेल्या पक्षकारांना पुढील तारखा देण्यात आल्या. तर अन्य दुसऱ्या न्यायालयाचे कामकाज मात्र नियमीत सुरू होते. येथील न्यायालयाचे प्रथम वर्ग दिवानी न्यायाधिश डी. जी. जगताप यांना गुरूवारी उच्च न्यायालयाचे आदेशान्वये जिल्हा न्यायाधिश एस. डी. जगमलानी यांनी येथील न्यायालयात येत निलंबनाचा आदेश बजावला. निलंबनाचे कारण मात्र समजू शकले नाही. निलंबन तात्पुरते असल्याची चर्चा शुक्रवारीही न्यायालय परीसरात होती.
यावलचे न्यायाधीश निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 16:47 IST