यावल येथे हत्येच्या उद्देशाने बैल नेताना तिघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:26 IST2020-07-27T18:25:49+5:302020-07-27T18:26:37+5:30

पोलिसात गुन्हा दाखल

At Yaval, three people were caught carrying a bull with the intention of killing it | यावल येथे हत्येच्या उद्देशाने बैल नेताना तिघांना पकडले

यावल येथे हत्येच्या उद्देशाने बैल नेताना तिघांना पकडले


यावल: गोवंश हत्येच्या उद्देशाने वाहनातून बैलास आणत असताना पोलिसांनी एक वाहन पकडले असून वाहनातील बैल मालकास सोपविण्यात अला आहे. सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील रईस बिसमील्लाखा, साजीद अजीज सय्यद व अब्ुदुल रसीद कच्छी हे वाहन क्रमांक एमएच-१४ डीएम-१६१४ मध्ये १५ हजार रुपये किमतीचे दोन वर्षाचा बैल आणत असतांना शहरात पहाटेच्या वेळी डयुटीवर असलेले पो. कॉ. गणेश मधुकर ढाकणे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन थांबविण्यास सागितले असता त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत वाहन पळवून नेत बैलास मूळ मालकाकउे नेवून सोडले. पो. कॉ. ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन येथील पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ नितीन चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Web Title: At Yaval, three people were caught carrying a bull with the intention of killing it