यावल तालुक्यात झाली लसीकरणास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:41+5:302021-09-03T04:16:41+5:30
चुंचाळे : यावल तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दहिगाव व मोहराळा येथे कोविड प्रतिबंधक ...

यावल तालुक्यात झाली लसीकरणास गर्दी
चुंचाळे : यावल तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दहिगाव व मोहराळा येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावल शहरासह तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मंगळवारी मुबलक प्रमाणात कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने १ सप्टेंबर रोजी बुधवारी तालुक्यातील सर्वच कोविड लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र दहिगाव, मोहराळा येथे नागरिकांना गावपातळीवरच लसीकरण सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आवश्यकतेनुसार व लससाठा उपलब्धतेनुसार कोविड लसीकरणाचे आयोजन केले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शोभा चौधरी व आरोग्य साहाय्यक एल.जी. तडवी हे परिश्रम घेत आहेत.
लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुण-तरुणींनी व नागरिकांनी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दहिगाव ग्रामपंचायत लसीकरण केंद्रावर नंबर लावण्यावरून दोन वेळेस वाद झाला होता. त्यामुळे काही काळ लसीकरण बंद करण्यात आले होते.
दहिगाव येथे ४००, सावखेडा सिम येथे ३०० व मोहराळा येथे ३०० असे अशी १००० नागरिकांना लस देण्यात आली. या वेळी दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता व दुसऱ्या डोसला पात्र नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.
लसीकरण प्रसंगी दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन, ग्रा. वि. अधिकारी योगेंद्र अहिरे व अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, प्रवीण सराफ समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख, डॉ. रोशनआरा शेख, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, अभय नाले, भूषण पाटील, आरोग्य सेविका अनिता नेहते, शाबजान तडवी, प्रतिभा चौधरी, दीपाली पाटील या आरोग्य पथकाने लसीकरण मोहीम राबविली.
स्पॉट रजिस्ट्रेशन अरविंद जाधव व भूषण पाटील यांनी केले. शिबिरास चंद्रकला चौधरी, कल्पना पाटील, आशा सेविका पुष्पा पाटील, नीता महाजन, भाग्यश्री महाजन, अर्चना अडकमोल, संध्या बाविस्कर, निर्मला पाटील, योगिता पाटील तसेच दहिगाव ग्रा.पं.चे ग्रामविकास अधिकारी योगेंद्र अहिरे, अरुण पाटील, नितीन जैन, विजय पाटील व सुधाकर पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले.