यावल तालुक्यात दिडशेवर शेतकऱ्यांचा मका घरात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:23 IST2020-08-04T16:23:11+5:302020-08-04T16:23:18+5:30
खरेदीची मागणी : अनेक शेतकऱ्यांना विक्रीचे पैसेही मिळाले नाही

यावल तालुक्यात दिडशेवर शेतकऱ्यांचा मका घरात पडून
यावल/ दहिगाव:: दीडशेवर शेतकºयांचा मका अद्याप खरेदी झालेला नसल्याने तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर जो कोटयवधी रुपयांचा मका शासनाने खरेदी केला आहे, त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही. हे पैसे त्वरीत मिळावे आणि उर्वरीत सर्व शेतकºयांचा मका खरेदी करावा अशी मागणी होत आहे.
तालुक्यात मका उत्पादक शेतकरीही मोठया संख्येने आहेत. किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीला दोनदा मुदतवाढ मिळूनही तालुक्यातील १५० शेतकरी मका खरेदीपासून वंचित राहिले आहेत. आता खरेदी बंद झाली असून, मुदतवाढीच्या अपेक्षाही मावळल्या आहेत. शिवाय जून व जुलैमध्ये खरेदी झालेल्या मक्याचे पैसेही शासनाने दिले नाहीत.
कोरोनामुळे दर घसरले
कोरोनामुळे बाराशे रुपयांनी मका विक्रीची नामुष्की आली असताना शेतकºयांना केंद्र सरकारने रब्बी हंगामातील मका खरेदीची गुड न्यूज दिली. तालुक्यात पहिल्यांदाच रब्बी हंगामातील खरेदीला २५ मेपासून केंद्रांवर सुरवात झाली. मात्र, उद्दिष्टपूतीर्मुळे ३० जूनपूर्वीच पोर्टल बंद होऊन खरेदी थांबली होती. त्यानंतर १५ जुलैपर्यंत व पुन्हा ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर २५ ला खरेदी सुरू होऊन ३० जुलैला बंदही झाली आहे.
खासगी व्यापाºयाकडून
कमी दरात खरेदी
खासगी बाजारात सरासरी एक हजार २०० रुपयांचा दर असून, शासकीय हमीभाव मात्र एक हजार ७६० रुपयांचा असल्यामुळे शेतकºयांनी शासनाकडे मका विक्रीसाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु निम्म्या शेतकºयांना वंचितच रहावे लागले.
दरम्यान आतापर्यंत तालुक्यातील फक्त फक्त ३० शेतकºयांना मका खरेदीचे शासनाकडून पैसे मिळाले. त्यानंतर एकाही शेतकºयाला रुपयाही मिळाला नसून, खरेदी करुन दोन महिने पूर्ण होतील तरी शेतकरी पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेतच आहेत.
रब्बी हंगामात मक्याचे भाव कोसळले असताना शासकीय मका खरेदीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना निश्चितच आधार मिळाला आहे.
खरीप हंगामाची पिके उभी करताना गरजेइतके पीककर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. प्रशासनाने त्वरित मक्याचे पेमेंट अदा करून शेतकºयांना दिलासा द्यावा व खरेदी पासुन वंचीत शेतकºयांची लवकरात लवकर मका खरेदी करावी . अशी मागणी शेतकरी करीत आहेत