यावलला मयताच्या पालकांना अपघात विमा धनादेश वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:48+5:302021-07-07T04:20:48+5:30
यावल : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पुंडलिक चंद्रकांत सोनवणे (एफ. वाय. बी.ए.) या विद्यार्थ्याच्या पालकांना अपघात ...

यावलला मयताच्या पालकांना अपघात विमा धनादेश वितरित
यावल : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पुंडलिक चंद्रकांत सोनवणे (एफ. वाय. बी.ए.) या विद्यार्थ्याच्या पालकांना अपघात विमा धनादेश वितरित करण्यात आला.
पुंडलिक सोनवणेचे १५ जून २०२० रोजी अपघाती निधन झाले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी कल्याण विभागाकडून विद्यार्थी सुरक्षा अपघात विमा योजनेंतर्गत मयत विद्यार्थ्यांचे कुटुंब पालक वंदना सोनवणे व चंद्रकांत सोनवणे यांना पाच लाख रुपये तसेच कुलगुरू वैद्यकीय निधीतून अतिरिक्त सहाय्य रक्कम १० हजार रुपये यांचा धनादेश देण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब निंबाळकर व ज्येष्ठ संचालक जयवंतराव देशमुख यांच्या हस्ते मयताच्या कुटुंब पालकांना धनादेश प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे होत्या. मान्यवरांची भाषणे झाली.
सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे, प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी, तर आभार डॉ. एस. पी. कापडे यांनी मानले. उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा .एस. आर. गायकवाड, मिलिंद बोरघडे यांनी सहकार्य केले.