यावल उपनगराध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:39+5:302021-09-25T04:15:39+5:30
यावल : येथील उपनगराध्यक्षपदी अभिमन्यू विश्वनाथ चौधरी यांची शुक्रवारी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात पिठासन अधिकारी तहसीलदार ...

यावल उपनगराध्यक्षपदी
यावल : येथील उपनगराध्यक्षपदी अभिमन्यू विश्वनाथ चौधरी यांची शुक्रवारी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात पिठासन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांनी या निवडीसाठी दुपारी ऑनलाइन विशेष सभा घेतली. मुदतीत एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर उपनगराध्यक्ष चौधरी यांचे नगराध्यक्ष नौशाद तडवी यांच्यासह सत्ताधारी गटाकडून स्वागत करण्यात आले.
उपनगराध्यक्षा देवयानी गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवारी २४ रोजी ही निवड करण्यात आली. सत्ताधारी गटातील अभिमन्यू चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना सुचक म्हणून कॉंग्रेसचे समीर शेख मोमीन यांनी तर शहर विकास आघाडी गटनेता अतुल पाटील यांनी अनुमोदन दिले.
सभागृहात नगराध्यक्षा नौशाद तडवी व त्यांचे पती नौशाद तडवी यांनी नव्या उपनगराध्यक्षांचे स्वागत केले. पालिकेत ऑनलाइन सभेच्या कामकाजात कार्यालयीन अधीक्षक विजय बडे यांनी सहकार्य केले. सत्तारूढ गटात शहर विकास आघाडी गटाचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, महर्षी व्यास आघाडीचे गटनेते राकेश कोलते यांनी ही स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक मुकेश येवले, समीर मोमीन, कल्पना वाणी, देवयानी महाजन, शीला सोनवणे, पौर्णिमा फालक, रेखा चौधरी, रुख्माबाई भालेराव, शीला सोनवणे, दिलीप वाणी, गणेश महाजन, राजेंद्र फालक, सागर चौधरी, अयाज देशमुख आदी उपस्थित होते.