यावल, जि.जळगाव : शेतकºयाकडे १५ हजार रुपयांची मागणी करणाºया यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून विजय पुंडलिक पाटील (रा. सुयोग कॉलनी, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.शेतीला पत्नीचे नाव लावण्यात यावे, यासाठी संबंधित शेतकºयाने अर्ज दिला होता. त्यावर पाटील यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आणि काम लवकर होण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली.यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीत करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसात गुन्हा नोंदवून पाटील यास अटक करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकूर हे तपास करीत आहेत. तालुक्यात लागोपाठ दुसºया दिवशी महसूल विभागात ही कारवाई झाली आहे.
यावल येथे १५ हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 02:02 IST
यावल , जि.जळगाव : शेतकºयाकडे १५ हजार रुपयांची मागणी करणाºया यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून विजय पुंडलिक पाटील (रा. सुयोग कॉलनी, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.शेतीला पत्नीचे नाव लावण्यात यावे, यासाठी संबंधित शेतकºयाने अर्ज दिला होता. त्यावर पाटील यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आणि ...
यावल येथे १५ हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकास अटक
ठळक मुद्देमहसूल विभागातील सलग दुसºया दिवशीही कारवाईमहसूल विभागात खळबळ