यावल येथे आंदोलकांनी स्नेहसंमेलन बंद पाडले, खुर्च्यांची फेकाफेक, एक विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 13:33 IST2018-01-03T13:33:28+5:302018-01-03T13:33:48+5:30
पाच बसेसची तोडफोड

यावल येथे आंदोलकांनी स्नेहसंमेलन बंद पाडले, खुर्च्यांची फेकाफेक, एक विद्यार्थी जखमी
ऑनलाईन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि. 03- भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी यावल येथे शहर बंद करण्यात आले. या नंतर पाच बसेसची तोडफोड करण्यात आली. यानंतर आंदोलकांनी साने गुरुजी विद्यालयाकडे वळत तेथे सुरू असलेले स्नेहसंमेलन बंद पाडत खुच्यार्ची फेकाफेक केली. यात एक विद्याथ्र्यी जखमी झाला.
बसेस बंदमुळे यावल आगाराचे साडे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बंदीस्त आवारात सुरू असलेले स्नेहसंमेलन बंद पाडल्याने पालकांसह विद्याथ्र्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.