डंपर चोरी प्रकरणात यासीन मुलतानीचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:14+5:302021-02-05T05:56:14+5:30

दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला धनंजय उर्फ भूषण हरचंद महाजन याला न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

Yasin Multani also involved in dumper theft case | डंपर चोरी प्रकरणात यासीन मुलतानीचाही सहभाग

डंपर चोरी प्रकरणात यासीन मुलतानीचाही सहभाग

दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला धनंजय उर्फ भूषण हरचंद महाजन याला न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोनाई कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद कंपनीचे मालकीच्या कॅम्प मधून एक रोलर, तीन डंपर ,पेवर मशीन यासह सेंट्रींग सामान स्टील शीट व इतर बांधकाम साहित्य असे तब्बल २७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबल्याने असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत सोनाई कन्स्ट्रक्शन मॅनेजर रोशन कुमार पाठक औरंगाबाद यांनी फिर्याद दिल्यावरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यासीन मुलतानी मास्टर माईंड

वाहने चोरुन त्याचे काही क्षणातच भंगार करण्यात यासीन मुलतानी तरबेज असून यापूर्वीही त्याच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अहमदनगर व जळगाव प्रशासनाकडून त्याला हद्दपार करण्यात आले होते. एमपीडीएचाही प्रस्ताव त्याच्याविरुध्द पाठविण्यात आला होता. सरकारी नोकरांवर हल्ल्याचाही त्याच्याकडून प्रकार झालेला आहे.

भंगार प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर

ट्रक चोरी व भंगारच्या गुन्ह्यात यासीन मुलतानीचे नाव वेळोवेळी आलेले आहे.तीन वर्षापूर्वी तर एक पोलीस कर्मचारी व एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचाही भंगार प्रकरणात सहभाग निष्पन्न झाला होता. मध्य प्रदेशातून चोरलेले दोन कोटी रुपयांचे तांबा, कॉपर व इतर साहित्य लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे धागेदोरे मालेगाव, जळगाव व इंदूर असे आढळून आले होते. मालेगावचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ.राजमाने यांनी केलेल्या चौकशीत जळगावच्या एक पोलीस व निवृत्त पोलिसाचा मुलगा या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीच्या संपर्कात असल्याचे उघड झाले होते. आता पुन्हा भंगार व डंपर चोरीचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

Web Title: Yasin Multani also involved in dumper theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.