यले मारी दडी, आते झडीवर झडी आहे त्या पिकांची नासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:59+5:302021-09-09T04:22:59+5:30
अमळनेर : मारवाड व अमळगावला अतिवृष्टी अमळनेर : सतत दीड दोन महिन्यांच्या खंड पडल्यानंतर पावसाने जोरदार आगमन केले. आता ...

यले मारी दडी, आते झडीवर झडी आहे त्या पिकांची नासा
अमळनेर : मारवाड व अमळगावला अतिवृष्टी
अमळनेर : सतत दीड दोन महिन्यांच्या खंड पडल्यानंतर पावसाने जोरदार आगमन केले. आता आता शेतातील पिके सडू लागली आहेत तर ठिकठिकाणी पाणी साचू लागले आहे. ‛पयले मारी दडी नि आते झडीवर झडी ’ मारी रायना अशी नाराजी मारवड परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. २४ तासात मारवड मंडळात १०५ मि.मी. पाऊस झाला आहे तर शिरूड मंडळात ९४मि.मी. पाऊस झाला आहे. अमळगाव ८० मिमी तर पातोंडा ८१.५ मिमी पाऊस झाला आहे.
अमळनेर ५६ मिमी, वावडे ५५ मिमी, नगाव ४८ मिमी, भरवस ६० मिमी पाऊस झाला आहे. एक दिवसात सरासरी ७२.४४ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण ३८७.२१ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्याच्या दृष्टीने अद्यपही सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. मात्र दोन दिवसात जोरदार झालेल्या पावसाने मारवड परिसरात शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.
प्रतिक्रीया
शेतात पाणी साचल्याने आहे ते कपाशीचे पीक गेले , रोपे सडू लागली आहेत म्हणून शासनाने आताच १०० टक्के पीक विमा मंजूर करावा - जनार्दन गंगाराम पाटील, मारवड, ता अमळनेर