महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:15 IST2021-05-26T04:15:50+5:302021-05-26T04:15:50+5:30
अमळनेर : तालुक्यातील गंगापुुरी येथे अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी गेलेल्या महसुलाच्या पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्यावर जीवघेणा ...

महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
अमळनेर : तालुक्यातील गंगापुुरी येथे अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी गेलेल्या महसुलाच्या पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा निषेध व्यक्त करत अमळनेर तालुका तलाठी संघाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.
तलाठी संघाने प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ याना निवेदन दिले आहे. गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले तरी गुन्ह्यातील आरोपीस अटक केलेली नाही, त्यामुळे आरोपीस अटक होईपर्यंत कोविडवगळता व नैसर्गिक आपत्ती वगळता इतर कामांसाठी लेखणीबंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना अध्यक्ष गणेश राजाराम महाजन, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, कार्याध्यक्ष स्वप्नील कुलकर्णी, चिटणीस मुकेश देसले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पवार, सहचिटणीस पिंटू चव्हाण, ऑडिटर वाय. आर. पाटील व तलाठी उपस्थित होते.