संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजा पूजन करण्यात आले. 'इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो' या घोषणांनी परिसर दुमदुमला.दरवर्षी निघणारी बळीराजाची भव्य मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली. मात्र शहरातील बळीराजा स्मारक येथे बळीराजा लोकोत्सव समितीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमत बळीराजाचे पूजन केले. याप्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले, तर उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटील, प्रशांत निकम, वसुंधरा लांडगे, नगरसेवक श्याम पाटील, सामजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा.लीलाधर पाटील, जे.बी. पाटील, विनोद कदम, प्रवीण पाटिल, नगरसेवक विवेक पाटिल, ऍड.तिलोत्तमा पाटिल, माधुरी पाटील, सयाजीराव पाटिल, बी. जी पाटील, दिलीप पाटिल, आर बी पाटिल, एस.एन. पाटिल, दशरथ लांडगे, गहिनाथ पाटिल, महेश पाटिल, आबा चौधरी, महेश चौधरी, बाबा भोसले, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विक्रांत पाटील आदिंनी पुष्प अर्पण करून बळीराजाचे स्मरण केले.शिरूड नाका परिसर येथेही सालाबादप्रमाणे बळीराजा प्रतिमेचे पूजन स्थानिक राहिवाशस्यानी केले. आमदार अनिल भाईदास पाटिल हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. जय अंबे मित्र मंडळ यांनी पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
अमळनेरात बलिप्रदेनिमित्त बळीराजाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 15:13 IST