पांढऱ्या सोन्याच्या तेजी-मंदीमुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:33 PM2019-03-22T18:33:58+5:302019-03-22T18:34:09+5:30

कुणाला भाववाढीचा फायदा तर कुणाला कमी भावाचा फटका

Worried by the rapid rise of white gold | पांढऱ्या सोन्याच्या तेजी-मंदीमुळे चिंता

पांढऱ्या सोन्याच्या तेजी-मंदीमुळे चिंता

googlenewsNext

आडगाव, ता.चाळीसगाव : निसर्गाच्या अवकृपेने गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पूर्ण पाणी फिरले असताना कापसाच्या भावातील चढ-उताराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील त्यातच मन्याड परिसरातील शेतकºयांचे खरीपातील मुख्य पीक म्हणजे पांढरे सोने म्हणजेच कपाशी या पिकावरच शेतकºयांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. कपाशी पिकाने साथ दिली तरच लग्न समारंभ, विविध संस्थाचे कर्ज, इतर देणे-घेणे तसेच रब्बी हंगामाचा खर्च, गुरांचा चारा इत्यादी आर्थिक गणित हे कपाशीच्या उत्पन्नावरूनच सोडविले जाते. परंतु गेल्या खरीपात पर्जन्यमान कमी झाल्याने कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. एकरी १२ ते १५ क्वींटल पर्यंत उत्पन्न निघणारे ते यावर्षी फक्त पाच क्विंटलपर्यंतच आले ते ही ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनाच हे शक्य झाले. कोरडवाहू शेतकºयांना तर काहीच हाती आले नाही.
यावर्षी उत्पन्न कमी त्यामुळे कपाशी सुरूवातीपासून सहा हजाराच्या पुढे विकली जाईल असा अंदाच बांधून २५ टक्के शेतकºयांनी सुरुवातीलाच म्हणजे नोव्हेबर-डिसेंबरच्या कालावधीत ६००० ते ६ हजार १०० प्रती क्विंटल भावात कापूस विकला. ७५ टक्के शेतकºयांनी यंदा दुष्काळ आहे म्हणून कपाशीचे सर्वत्र उत्पन्न कमी आहे त्यामुळे आणखी भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवला. मात्र नंतर हळूहळू भाव कमी होत गेले. ६००० ते ६१०० वरून थेट ५१०० ते ५२०० रूपयापर्यंत म्हणजे एक हजार प्रती क्विंटलने भाव खाली आले.
जानेवारी महिन्यातील संक्रात सणानंतर भाव वाढतात हा दरवर्षाचा अनुभव लक्षात घेता १५ जानेवारीपासून ते १५ फेब्रुवारीपर्यंत भाव ५४०० पर्यंत स्थिर राहिले. फेब्रुवारी संपायला आला तरी भाव वाढण्याचे काहीही संकेत दिसत नव्हते. पुढे लोकसभेची निवडणूक येत आहे. आता काही भाव वाढणार नाही म्हणून जवळ-जवळ ५० टक्के शेतकºयांनी ५४०० च्या भावाने कापूस विकून टाकला.
यात राहिले ते २५ टक्के मोठे बागायतदार शेतकरी. या शेतकºयांनी भविष्यकाळात कापसाचे बाजार भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवल्यानंतर मार्च महिन्याच्या १८-१९ तारखेनंतर कापूस ५७०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटल भाव झाले. १९ मार्च रोजी काही ठिकाणी खाजगी व्यापाºयांनी ६००० ते ६१०० रूपये पर्यंतने खरेदी केला. म्हणजेच ५० टक्के शेतकºयांना भाव कमीचा फटका बसला तर ५० टक्के शेतकºयांना भाववाढीचा फायदा झाला.
यंदा उत्पन्नात मोठी घट
दरवर्षा प्रमाणेच यावर्षीदेखील कपाशी पिकावर शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केले होते. गेल्या खरीप हंगामात बोंड अळीच्या प्रार्दुभावाने कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. परत बोंडअळी पडू नये म्हणून यावर्षी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच दक्षता घेतली. परंतु यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकºयांच्या उत्पन्नात जवळ-जवळ मोठी घट झाली. उलट बोंडअळीच्या काळात शेतकºयांना चांगले उत्पन्न हाती आले होत, असेही काही कापूस उत्पादक सांगत आहे.

Web Title: Worried by the rapid rise of white gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव