विद्यापीठाच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:26+5:302021-07-01T04:13:26+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन मिळाले असून यात प्रशाळातील प्राध्यापक आणि ...

World ranking of 35 researchers of the university | विद्यापीठाच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन

विद्यापीठाच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन मिळाले असून यात प्रशाळातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वर्ल्ड सायंटिस्ट ॲण्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये एवढ्या मोठया प्रमाणावर यश मिळण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा.मूरत आल्पर आणि प्रा.सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर-डॉजर सायंटिफिक इंडेक्स तथा ए.डी.सायंटिफिक इंडेक्स विश्लेषित केलेला आहे. जगभरातील १८१ देशांतील १० हजार ६५५ विद्यापीठातील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांमधून करण्यात आलेल्या निवडीमधून वर्ल्ड सायंटिस्ट ॲण्ड युनिव्हर्सिटी रँकिंग -२०२१ जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३५ संशोधकांनी स्थान पटकावले आहे. यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांचा समावेश आहे.

- असे आहेत मानांकन मिळालेले संशोधक प्राध्यापक

विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्था - प्रा.जे.बी.नाईक, प्रा.सत्येंद्र मिश्रा (सेवानिवृत्त), प्रा.चिंतामण आगे, प्रा.अजयगिरी गोस्वामी, प्रा.विकास पाटील., लाईफ सायन्सेस प्रशाळा - प्रा. ए.बी.चौधरी, प्रा.अरुण इंगळे, प्रा.प्रवीण पुराणिक, प्रा.भूषण चौधरी, डॉ.सतीश पाटील., भौतिकशास्त्र प्रशाळा - प्रा.डी.एस.पाटील, प्रा.पी.जी.चव्हाण, प्रा.ए.एम.महाजन, प्रा.जयदीप साळी, प्रा.संजय घोष, प्रा.जसपाल बंगे., केमिकल सायन्सेस प्रशाळा - प्रा.विकास गिते, डॉ.दीपक दलाल, डॉ.अमूल बोरसे(सेवानिवृत्त)., संगणकशास्त्र प्रशाळा - प्रा.सतीश कोल्हे, प्रा.राकेश रामटेके, डॉ.मनीष जोशी., पर्यावरणशास्त्र प्रशाळा - प्रा.पी.आर.पाटील(सेवानिवृत्त)., शिक्षणशास्त्र प्रशाळा-डॉ.मनीषा इंदाणी.

-मानांकन मिळालेले संशोधक विद्यार्थी

भावना मोहिते, चिन्मय हाजरा, देबावीष कंडू, जितेंद्र भोसले, बिपीन साळुंखे, केशरसिंग पाटील, राहुल साळुंखे, दत्ता ढाले, नरेंद्र मोकाशे आणि संदीप राजपूत यांचा समावेश आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी सर्व मानकरी संशोधकांचे उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

Web Title: World ranking of 35 researchers of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.