शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

जगाला बदलणारे पेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:05 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘चहा’ या सदरात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका शशांक कुलकर्णी यांचा विशेष लेख.

चहामुळे काय बदलले नाही? देशोदेशींचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला. सामाजिक रीतीरिवाज आमूलाग्र बदलले. वर्ग आणि वंश यामधील भिंती अधोरेखित करण्यात हे पेय कारणीभूत झाले. हुजूर आणि मजूर वर्गातल्या संबंधांवर ह्या व्यवसायाची गडद छाया पडली, इतकेच काय परंतु वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रगतीही ह्या पेयामुळे झाली. चहाने आपल्याला काय दिले? त्यासाठी आपण काय गमावले? शोध मनोरम आहे. ‘चहा’ साधा शब्द. पाहुणचार करताना भारतातली गरिबातली गरीब गृहिणीदेखील म्हणेल ‘बसा. चहा टाकते.’ चहा ‘एक असे अद्भुत पेय ज्याने जगाचा चेहरा-मोहरा बदलला, इतिहास घडवला, विचारसरण्या बदलल्या.’ आज अनेक देशात पाण्याच्या खालोखाल प्यायले जाणारे पेय आहे चहा. या चहामुळे जगात कायकाय उलथापालथ झाली! स्वत: निरुपद्रवी असलेल्या चहावरून युद्धे झाली आणि ती लढण्यासाठी धनदेखील या चहानेच पुरवले. अफूसारख्या मादक पदार्थाचा व्यवसाय तेजीत आला तो या चहामुळे. एकीकडे अनेक व्याधींवरचा रामबाण उपाय म्हणून तो वाखाणला गेला ! चहा लागवडीसाठी अनेक जंगले नष्ट झाली, परंतु जगभर दळणवळणाचे नवनवे मार्ग खुले झाले. कधी त्यामुळे देशादेशात परस्पर संबंध प्रस्थापित झाले तर अनेक वेळा ते बिघडले, तुटले. एकीकडे चहामुळे व्यापारी गब्बर, श्रीमंत झाले, तर दुसरीकडे मजुरांना जन्मभर वेठबिगारी करत वतनाला मुकावे लागले. चहाच्या निर्यातीसाठीच तर अधिकाधिक वेगवान जहाजे तयार झाली आणि आगगाडय़ांचे नवे प्रदीर्घ मार्ग अस्तित्वात आले. हा इतिहास घडवणारे अनेक आहेत नायक आणि खलनायक, व्यापारी आणि संधीसाधू, काही बेछूट, बेलगाम, तर काही कडक शिस्त पाळणारे, दूरदृष्टी असणारे, प्रतिगामी आणि पुरोगामी. चहाबागेत राबणारी राठ हातांची मजूर स्त्री आणि नाजूक बोटात चहाचाकप धरणारी उच्चभ्रू स्त्री. सुष्ट आणि दुष्ट, नवे आणि जुने सा:यांचे प्रतिबिंब ह्या इतिहासात आहे. आपल्या चिनी शेजा:यांना गेली साडेचार हजार वर्षे चहा ज्ञात आहे, मग भारतात तो गेल्या शतकापयर्ंत का अज्ञात होता? गेल्या 90 वर्षात चहा हे भारतीयांचे प्रथम पेय कसे झाले? आज जागतिक चहा उत्पादनात भारत अग्रेसर का आणि कसा झाला? आपल्यावर दीडशे वर्ष राज्य करणा:या इंग्रजांची भूमिका काय होती? त्यांच्या नफा तोटय़ाचे गणित काय होते? साल ख्रिस्तपूर्व 2737. ‘शेन नुंग’ हे चिनी सम्राट प्रवासात असताना एका झाडाखाली विश्रांती घेत होते. नेहमीप्रमाणे त्यांचे प्यायचे पाणी एका हंडय़ात उकळत होते. त्या पाण्यात झाडाची पाने पडली. शेन नुंग संशोधक व वनस्पतीशास्त्रज्ञ. अपघाताने तयार झालेला काढा त्यांना इतका आवडला की सेवकाला दंड झाला नाही! उलट त्यांनी पद्धतशीरपणे चीनमध्ये त्याची लागवड केली. काही लोक म्हणतात ‘सम्राट कुठला? अहो, साधा शेतकरी होता तो!’ (शेन नुंग म्हणजे स्वर्गीय शेतकरी). काही का असेना, त्यांनी जवळजवळ तीन हजार वनस्पतींचे काढे बनवून ते वापरात आणले. हा नवा काढा तर चिनी आणि जपानी संस्कृतीचा अविभाज्य घटक बनणार होता.