शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक केळी दिन! १५० वर्षे झाली, केळी अजूनही फळ नाही; राजमान्यतेची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 07:13 IST

केळीला राजमान्यता मिळण्यास किती वाट पाहावी लागणार, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे.

राजेंद्र भारंबे, लोकमत न्यूज नेटवर्कसावदा (ता. रावेर)  : याला फळ म्हणावे की नाही, असा प्रश्न आजही कायम आहे त्या केळीचा १७ एप्रिल हा जागतिक दिवस. अजूनही  सरकारच्या फळांच्या यादीत केळीचा समावेश नाही. केळीला राजमान्यता मिळण्यास किती वाट पाहावी लागणार, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे. कोचूर (ता. रावेर, जि. जळगाव) शिवारात १८४४ ते १८५०च्या दरम्यान  पहिल्यांदा केळी लागवड झाली. त्यानुसार जिल्ह्यात  केळी सुमारे दीडशे वर्षांची झाली, तरी फळ की आणखी काय हा प्रश्न कायम आहे. फळाचा दर्जा नसल्याने केळी उत्पादकांना बऱ्याच योजनांचा फायदा मिळत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या वर्षी शासनाने केळीला फळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. 

दर्जाचे फायदे काय?  - निर्यातीसाठी शासनातर्फे तत्काळ सोयी-सुविधा पुरविण्यात येतील. - नैसर्गिक नुकसान झाले तर तत्काळ मोबदला मिळू शकतो.- उती संवर्धित रोपांसाठीही अनुदान, देखभालीसाठी खर्च मिळू शकतो.

निकषानुसार फळझाडाची एकदा लागवड केली की, ते झाड दीर्घकाळ फळ देते. या उलट केळीच्या झाडाचे आयुष्य सुमारे दीड ते दोन वर्षाचे. त्यामुळे अन्य फळ पिकांच्या तुलनेत केळीच्या पिकाला नैसर्गिक आपत्तीमध्ये समाधानकारक नुकसान भरपाई मिळत नाही. - वसंत महाजन, केळी उत्पादक  

टॅग्स :JalgaonजळगावBananaकेळी