तेरापंथ महिला मंडळातर्फे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:14 IST2021-01-15T04:14:23+5:302021-01-15T04:14:23+5:30

कार्यशाळेचा शुभारंभ सामूहिक नवकार मंत्रचा जाप द्वारा करण्यात आला. मंडळातील भगिनी सुनीता चोरडिया, जयश्री लोढा, प्रिया छाजेड आणि ...

Workshop by Terapanth Mahila Mandal | तेरापंथ महिला मंडळातर्फे कार्यशाळा

तेरापंथ महिला मंडळातर्फे कार्यशाळा

कार्यशाळेचा शुभारंभ सामूहिक नवकार मंत्रचा जाप द्वारा करण्यात आला. मंडळातील भगिनी सुनीता चोरडिया, जयश्री लोढा, प्रिया छाजेड आणि हिमांशू सेठिया यांच्याद्वारे मधुर गीत सादर करण्यात आले. दि. १९ डिसेंबर रोजी आयोजित केल्या गेलेल्या खान्देशस्तरीय संवर्धन कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासंदर्भात अखिल तेरापंथ महिला मंडळाद्वारा प्राप्त संदेशाचे वाचनमंत्री रिटा बैद यांच्याद्वारे करण्यात आले. अध्यक्षा निर्मला छाजेड यांनी मार्गदर्शन केले तसेच नम्रता सेठिया, स्नेहलता सेठिया, पुष्पा सेठिया, सरला ललवानी, वीणा छाजेड, स्नेहा मालू, हिमांशू सेठिया, खुशबू बाफना, पूजा मालू, उमा सांखला, खुशबू दुगड यांनीही मनोगत व्यक्त केले.

उमा सांखला आणि रानी चोरडिया यांनी सुंदर मराठी लावणी प्रस्तुत केली.

कार्यशाळेच्या पश्चात पूजा मालू आणि मीतू धाडेवा यांच्याद्वारा मनोरंजक खेळ खेळण्यात आले. सूत्रसंचालन मोनिका छाजेड यांच्याद्वारे करण्यात आले आणि आभार तारामणी सुराणा यांच्याद्वारे करण्यात आले. कार्यशाळेचे आयोजन कोषाध्यक्ष वीनिता समदडिया आणि प्रचार प्रसारक मंत्री मधु छाजेड, सहमंत्री मितू धाडेवा यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Workshop by Terapanth Mahila Mandal