नवीन बांधकाम नियमावर क्रेडाईच्यावतीने १९ रोजी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:14 IST2021-01-17T04:14:30+5:302021-01-17T04:14:30+5:30

जळगाव : नवीन बांधकाम नियमावली तसेच रहिवास, औद्योगिक बिनशेती सहज व सुलभ करण्यासाठी शासनाच्यावतीने करण्यात आलेले बदल यासंदर्भात क्रेडाईच्यावतीने ...

Workshop on new construction rules on behalf of CREDAI on 19th | नवीन बांधकाम नियमावर क्रेडाईच्यावतीने १९ रोजी कार्यशाळा

नवीन बांधकाम नियमावर क्रेडाईच्यावतीने १९ रोजी कार्यशाळा

जळगाव : नवीन बांधकाम नियमावली तसेच रहिवास, औद्योगिक बिनशेती सहज व सुलभ करण्यासाठी शासनाच्यावतीने करण्यात आलेले बदल यासंदर्भात क्रेडाईच्यावतीने मंगळवार, १९ रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल येथे सकाळी ९.३० ते दुपारी दोन या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये राज्याच्या नगर रचना विभागाचे निवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते व नाशिक विभागाच्या नगर रचना सह संचालिक प्रतिभा भदाणे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रहिवास, औद्योगिक बिनशेती सहज व सुलभ करण्यासाठी केलेले बदल या विषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन क्रेडाईचे राज्य सहसचिव अनिश शहा, क्रेडाई जळगावचे अध्यक्ष निर्णय चौधरी, सचिव पुष्कर नेहेते यांनी केले आहे.

Web Title: Workshop on new construction rules on behalf of CREDAI on 19th