जळगाव- केसीई व्यवस्थापन शास्त्र विभागातर्फे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी आत्मविकासातंर्गत आत्मजागरुकता या विषयावर कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली़यावेळी कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. स्वाती सवंतसर होत्या. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविकास साधने अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थांनी स्वत: जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यासाठीचे विविध तंत्र आपल्या दैनंदिन व्यवहारात कसे आचरावे हे डॉ. स्वाती सवंतसर यांनी विद्यार्थ्यांनी विविध उदाहरणाद्वारे समजवून सांगितले़ ह्या प्रसंगी विभागप्रमुख प्रा.संजय सुगंधी, प्रा.डॉ.वीणा भोसले, प्रा.पूनम वाणी,प्रा.मयूर बोरसे, प्रा.डिगंबर सोनवणे व प्रा.कांचन नेमाडे आदी उपस्थित होते.