Workshop on Government Grade Examination Painting at Chalisgaon | चाळीसगाव येथे शासकीय ग्रेड परीक्षा चित्रकलेवर कार्यशाळा
चाळीसगाव येथे शासकीय ग्रेड परीक्षा चित्रकलेवर कार्यशाळा
चाळीसगाव, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ संलग्न जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ व रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांच्यातर्फे ग्रेड परीक्षा चित्रकला मार्गदर्शन कार्यशाळा राष्ट्रीय महाविद्यालयात घेण्यात आली.
या वेळी मंचावर रंगगंध कलासक्त न्यासचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरुण निकम, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, सी.एच. पाटील, चित्रकार धर्मराज खैरनार, सादिक शेख, योगेश पवार, अमोल येवले, जे.वाय शेख, किरण मगर, राजेंद्र चिमणपुरे, रमेश पोदार उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरवात जगविख्यात चित्रकार स्व.केकी मुस व नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अरुण निकम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत चित्रकलेला आपल्या जीवनात महत्त्व आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात असलेला कला विषय इतर विषयांप्रमाणेच तितकाच महत्त्वाचा आहे, असे सांगितले.
कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना चित्रकार धर्मराज खैरनार, एस.बी.शेख, अमोल येवले, योगेश पवार, जे.वाय.शेख, किरण मगर यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमावर वस्तुचित्र, स्मरणचित्र, स्थिरचित्र, अक्षरलेखन व भौमितिक रचना यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
गत वर्षी या परीक्षेत महाराष्ट्रातून सातवी आलेली मोक्षदा नारायण मोरे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत शहरी व ग्रामीण भागातील ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जी.टी. जाधव, पी.वाय.वाघ, जी.पी कवळासे, बी.पी.ओतारी, सतीश देवकर, शिशिर निकम, रूपाली चौधरी, जयश्री पाटील, मनीषा पवार, सचिन साळुंखे, योगेश कोठावदे, एस.के.दाभाडे या कलाशिक्षकांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन शालिग्राम निकम यांनी केले व आभार अविनाश सोनवणे यांनी मानले.

 


Web Title: Workshop on Government Grade Examination Painting at Chalisgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.