शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 19:04 IST

जळगाव - आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांमार्फत होत असते. शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गुरू असतो. समाजात शिक्षकाला आदराचे स्थान ...

ठळक मुद्दे राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांवरच सारे घेतले जाते खपवून

जळगाव - आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांमार्फत होत असते. शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गुरू असतो. समाजात शिक्षकाला आदराचे स्थान आहे. शाळेतून सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा त्याचा अखंडित प्रवास सुरू असतो. मात्र, जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल असा सूर विविध शिक्षक संघटनांतून उमटत आहे.निवडणूक आयोगाचे महत्वाचे काम आहे. हे सर्वच मान्य करतात. त्याचे प्रशिक्षण घेणे, मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी, कर्मचारी म्हणून ड्युटी करणे हे काम सर्व शिक्षक राष्ट्रीय कार्य म्हणून आवडीने करतात. परंतु, याव्यतिरिक्त अनेक कामाचे दडपण, अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे शिक्षकांवर आले आहे. इतरही कोणतेही कामे असो, ते शिक्षकांचे माथी मारले जाते. त्यात मतदार यादी सर्वेक्षण, शौचालय नोंदणी, विविध जनजागृती, आरोग्य तपासणी विभागाचे विविध कार्य, मतदान याद्या तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. यातून सुटका कधी असा शिक्षकांचा प्रश्न आहे.गुरूजी शाळेत येतच नाही, असा होतो आरोपशिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा इतर अशैक्षणिक काम जास्त करावे लागतात. या कामासाठी एक शिक्षक पूर्णपणे लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याची काम मागे पडतात. पर्यायाने शिक्षक शिकवतच नाही, शाळेतच येत नाही, असा विद्यार्थी अपप्रचार करतात. त्यामुळे पालकांचा शाळा व शिक्षकाप्रती पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यातच दोन शिक्षकी शाळा असली की, दुसर्या शिक्षकावरही ताण पडतो.शासकीय योजनांचा भार- शिक्षकांना मतदार यादी, पशु, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वे, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.- पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकॉर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमांत शिक्षक केंद्रस्थानी असतो.- कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.गुणवत्तेवर होतो परिणाम...शिक्षकांना अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात दिली जातात. याचा परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर होतो. अनेक शिक्षकांना मानसिक आजारासह इतर आजारही जडले आहेत. दोन शिक्षकी शाळांच्या शिक्षकांचे अधिक हाल हातात. त्यामुळे गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.- प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदजिल्हा परिषदेच्या शाळा - १८२७जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या - ७३७७जि. प. शाळा विद्यार्थी संख्या - १८३९६९

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव