आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : तालुक्यातील नांद्रा गावाजवळील गिरणा नदीपात्रानजीक झाडाला गळफास घेऊन हुसेन दगडू पिंजारी (वय-५०, रा़नांद्रा बु़ ता़ जळगाव) या मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.हुसेन पिंजारी हे मोलमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते़ गुरूवारी रात्री ते काही न सांगता घरातून बाहेर निघून गेले़ त्यानंतर त्यांनी गिरणा नदीपात्रा जवळ एका झाडाला बागायती रूमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ शुक्रवारी पहाटे ही घटना उघड झाली. त्यांनी लागलीच गावातील नागरिकांसह हुसेन यांच्या कुटुंबियांना कळविले़ त्यानंतर मृतदेह खाली उतरवून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती हुसेन यांना मृत घोषित केले़ हुसेन पिंजारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे़ मुलगा हा सुरतला वास्तव्यास आहे़
जळगाव परिसरात मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:05 IST
तालुक्यातील नांद्रा गावाजवळील गिरणा नदीपात्रानजीक झाडाला गळफास घेऊन हुसेन दगडू पिंजारी (वय-५०, रा़नांद्रा बु़ ता़ जळगाव) या मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे़
जळगाव परिसरात मजुराची आत्महत्या
ठळक मुद्देमयत नांद्रा येथील रहिवासीगिरणानदीपात्रानजीक संपविली जीवनयात्रारात्री घरी काही न सांगता गेले निघून