शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तरसोद-फागणे टप्प्याचे काम पुढील आठवड्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 16:28 IST

महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम सुरु होणारप्रक्रियेची अधिकाऱ्यांनी गडकरींना दिली माहितीठेकेदार ६० टक्के निधी उभारू न शकल्याने काम ठप्प

जळगाव : महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंतच्या चौपदरीकरणाची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाणून घेतली. यात या कामाची ई-निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती ‘नही’च्या अधिकाºयांनी गडकरी यांना दिली.महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मक्तेदार त्याच्या हिश्शाचा ६० टक्के उभारू न शकल्याने गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हालचालींना वेग आला व हे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.जिल्ह्यातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे अनेक महिन्यांपासून आहे. सुरुवातीला काही वर्ष तर निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने वाया गेले. तर नंतर एल. अ‍ॅण्ड टी. सारख्या कंपनीने मक्ता घेऊन नंतर काम सोडून दिले. अखेर जिल्ह्यातील कामाचे दोन टप्पे करून निविदा देण्यात आल्या. तरीदेखील मक्तेदार त्याच्या हिश्शाचा ६० टक्के उभारू न शकल्याने गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले आहे. मात्र आता तरी हे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जळगावातील रस्त्यांची घेतली माहितीबुधवारी दिल्ली येथे नितीन गडकरी यांनी राज्यातील रखडलेल्या रस्त्यांची माहिती जाणून घेतली. त्यात जळगाव शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंतच्या ८ किमी चौपदरीकरणाचीही विचारणा केली. त्यात नहीच्या अधिकाºयांनी या कामाची सुमारे ७० कोटींची ई-निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती गडकरी यांना दिली. दरम्यान, ३० जानेवारी २०१९पर्यंत या कामासाठी निविदा भरण्याची मुदत आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर आठवडाभरात किती निविदा दाखल झाल्या याबाबत मात्र आकडेवारी मिळू शकली नाही.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव