वरखेडे-लोंढे धरणाचे काम पुन्हा पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 08:39 PM2020-03-07T20:39:26+5:302020-03-07T20:42:52+5:30

आधी पुनर्वसन करण्याची नागरिकांची मागणी

work of varkhede londhe dam closed | वरखेडे-लोंढे धरणाचे काम पुन्हा पाडले बंद

वरखेडे-लोंढे धरणाचे काम पुन्हा पाडले बंद

Next
ठळक मुद्देप्रकल्पास्थळी ठिय्या दिला१०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत वरखेडे धरणाचे काम बंद ठेवावे अशी मागणी
कमत न्यूज नेटवर्कवरखेडे ता.चाळीसगाव : येथील तामसवाडी (ता.चाळीसगाव) गावाचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय वरखेडे-लोंढे बॅरेजचे काम सुरु करू देणार नाही असा पवित्रा गावकºयांनी घेऊन ते काम बंद पाडले होते. मात्र पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. याची कुणकुण लागताच तामसवाडी ग्रामस्थांनी शनिवारी धरणस्थळ गाठत काम बंद पाडले. यावेळी धरणस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तामसवाडी गावाचे १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत वरखेडे धरणाचे काम बंद ठेवावे अशी मागणी करीत वरखेडे-लोंढे प्रकल्पग्रस्तांनी गेल्या १८ फेब्रुवारी रोजी प्रकल्पास्थळी ठिय्या दिला. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला होता. या बाबत कृती समितीचे म्हणणे आहे की, वरखेडे-लोंढे बॅरेजमुळे विस्थापित होणाºया तामसवाडी गावाच्या बुडीत क्षेत्राच्या संपादित जमिनीच्या किंमती तसेच तामसवाडी गावातील मालमत्तेचे नुकसान भरपाई व १०० टक्के पुनवर्सन करण्याबाबत वेळावेळी निवेदन दिले आहेत. वरखेडे-लोंढे बॅरेंज चे गेल्या महिनाभरापासून बंद होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बॅरेंज दि ६ रोजी पोलीसबंदोबस्त सुरू करण्यात आला होता. मात्र ७ रोजी तामसवाडी धरणग्रस्त नागरिकांनी काम बंद पाडले. शनिवारी पुन्हा काम सुरू झाल्याने ते बंद पाडण्यात आले. पण काम सुरू रहाणार आहे, प्रशासनांकडून सांगण्यात आले.

Web Title: work of varkhede londhe dam closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.