मोकाट कुत्र्यांचा निर्बीजीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:14+5:302021-07-21T04:13:14+5:30
गेल्या काही दिवसात शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. मंगळवारी देखील पाच जण कुत्र्यांचा हल्ल्यात जखमी झाले आहेत. ...

मोकाट कुत्र्यांचा निर्बीजीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात
गेल्या काही दिवसात शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. मंगळवारी देखील पाच जण कुत्र्यांचा हल्ल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान मनपाने निविदा प्रसिध्द केल्यानंतर नंदुरबार येथील नवसमाज बहुउद्देशिय संस्थेची निविदा मंजुर झाली आहे. या संस्थेने दोन टक्के सुरक्षा अनामत रकमेचे ३ लाख रूपये भरावे असे पत्र शुक्रवारीच देण्यात आले आहे. रक्कम भरणा केल्यानंतर मनपाकडून करारानामा करून घेतला जाणार आहे.. ही संपुर्ण प्रक्रीया आठवडाभरात पुर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे करारनामा होताच दोन दिवसात संस्थेमार्फत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्ताचे काम हाती घेतले जाणार आहे. दरम्यान, यासाठी डॉगरूम देखील तयार करण्यात येणार असून, शहरातील विविध भागात जावून कुत्रे आणून या डॉगरुममध्ये नेवून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
तांबापुरातील तरूणाला कुत्र्याचा चावा
जळगाव : मंगळवारी तांबापुरातील संजय गायकवाड या २३ वर्षीय तरूणाला मोकाट कुत्र्याने पायाला गंभीर चावा घेतला. या तरूणाला सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून एआरएसचे इंजेक्शन देण्यात आले होते. यानंतर या तरूणाला घरी नेण्यात आले.