शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सायगाव परिसरात दुष्काळीस्थितीत हाताला नाही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:44 IST

कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.

ठळक मुद्देगिरणा व मन्याड परिसरातील शेतकरी त्रस्तदुष्काळ जाहीर पण हातात काय? शेतकऱ्यांचा सवालचाळीसगाव परिसरातील २२ खेड्यांचा प्रश्न कायम

सायगाव, ता.चाळीसगाव : कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.गिरणा मन्याड परिसरांत संकटमय प्रवासगिरणा मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने शेतकºयांचे आर्थिक चित्र पूर्णपणे कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर शेतकºयांसारखे हतबल होण्याची वेळ आलेली आहे.नविन वर्षात पाण्याचे संकटयावर्षी परतीच्या पावसानेदेखील हुलकावणी दिल्याने शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. त्यामुळे सन २०१८ हे वर्ष अतिशय निराशाजनक ठरत आहे. सन २०१९ या वर्षाला सुरुवात होत असताना जानेवारी ते जुलै दरम्यान जलसंकट भीषण राहणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होणार आहे.दुष्काळ जाहीर पण हातात काय?यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने शासनाने तालुका दुष्काळी घोषित केला. यावर्षी पावसाने दिलेली हुलकावणी आणि शेतकºयांनी वापरलेली महागडी बियाणे त्यामुळे शेतीचा खर्च देखील निघाला नाही. कांद्याला भाव नाही ऊसावर हुमणी रोगाचे आक्रमण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यात शेतमालाला योग्य तो भाव नाही. शासनाकडून दुष्काळ जाहिर झाला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणीदेखील केली. त्यामुळे शेतकºयांच्या व मजुर वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. परंतु शेतकºयांच्या हातात काय पदरी पडणार हा प्रश्न कायम आहे.शासनाकडुन शेतकºयांच्या अपेक्षागिरणा व मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे. शेतकºयाच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा वाढणार आहे. त्यामुळे शासनाने शेतसारा पूर्ण माफ करावा. तसेच कर्जमाफीपासून वंचित शेतकºयांना कर्ज माफ करीत मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयोची कामे सुरु करावी अशी मागणी होत आहे.२२ खेड्यांचा प्रश्न कायमयंदा पावसाळा पूर्ण कोरडा गेला. त्यातच मन्याड धरण पुर्णता कोरडे ठाक आहे. त्यामुळे मन्याड परिसरातील आलवाडी तळोदे शिरसगांव ब्राम्हण शेवगे देशमुखवाडी, काकडणे, माळशेवगे, सायगांव, नांद्रेसहीत २२ खेड्यांचा प्रश्न संकटमय झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुराढोरांचा प्रश्न त्यात मजुर वर्गाला काम नसल्याने आगामीे दिवस संकटमय जाणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळJalgaonजळगावagricultureशेती