चार तास बंद पाडले महामार्ग चौपदरीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 14:44 IST2019-06-14T14:44:40+5:302019-06-14T14:44:45+5:30

वरणगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती : नगराध्यक्षांसह नगरसेवक आक्रमक

The work of four-lane highway closed four hours | चार तास बंद पाडले महामार्ग चौपदरीकरणाचे काम

चार तास बंद पाडले महामार्ग चौपदरीकरणाचे काम


वरणगाव : शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन महामार्ग चौपदरीकरणात दाबली जावून तिला गळती लागली.त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला.ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी आधी पाईप लाईन दुरुस्त करा आणि मगच महामार्गाचे काम करा,अशी भूमिका घेत येथील नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल चारतास महामार्गाचे काम थांबविले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
पाईप लाईनबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वारंवार सांगूनही उपाय योजना झाली नाही. ही बाब काळे यांना समजताच त्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले.नगराध्यक्ष काळे आक्रमक झाले.त्यांनी सहकार्यांसोबत अंजनसोंडे गाठले आणि महामार्गाचे काम थांबविले. त्यांच्यासोबत साजिद कुरेशी, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, भाजपा शहरप्रमुख सुनील माळी, इरफान पिंजारी, मिलिंद मेढे यांच्यासह आकाश निमकर, भूषण राजपूत, गणेश तळले, गणेश कोळी,संजय माळी, रवी नारखेडे व वरणगावकरांनी महामार्गाचे सुरू असलेले काम चार तास बंद करून रस्ता बंद आंदोलन केले. पालकमंत्री गिरीश महाजन महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांशी फोन वरून पाईपलाईन दाबली आहे ती तत्काळ मोकळी करून त्यासाठी स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले. प्रसंगी नहीचे अधिकारी अरुण सोनवणे यांनी बुजलेली पाईप लाईन संपूर्ण मोकळी केली व पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले प्रसंगी शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.

Web Title: The work of four-lane highway closed four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.