सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:29+5:302021-07-18T04:13:29+5:30

शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आज पाळधी येथे पाळधी बांभोरी जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ...

Work with the common man's development as the focal point | सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून कामे करा

सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून कामे करा

शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आज पाळधी येथे पाळधी बांभोरी जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते.

याप्रसंगी गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसंपर्क अभियान फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या आपत्तीमुळे याला विलंब झाला असून आता ते राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथून शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली असून आता जिल्हा परिषद गट आणि गणानुसार मेळावे घेण्यात येत आहेत. शिवसेनेची ध्येयधोरणे ही जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कोणतेही मतभेद न बाळगता एकजुटीने पक्षबांधणी करावी. सामान्यांचा विकास हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने काम करण्याचे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले.

गाव कारभाऱ्यांनी केली नोंदणी

याप्रसंगी पाळधी - बांभोरी जिल्हा परिषद गटातील सुमारे १५ गावांच्या सरपंचांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसैनिक नोंदणी केली. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, तालुकाप्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, राजू पाटील, डी. ओ. पाटील, पाळधी सरपंच प्रकाश पाटील, शरद कोळी, चांदसरचे सचिन पवार, सुधाकर पाटील, दिलीप पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार जि.प. सदस्य प्रताप पाटील यांनी मानले.

Web Title: Work with the common man's development as the focal point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.