मराठा प्रीमियर लीगमध्ये महिलांचाही सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST2021-01-25T04:17:03+5:302021-01-25T04:17:03+5:30
जळगाव : मराठा प्रीमियर लीग २०२१ चौथ्या पर्वाचा समारोप सागर पार्क रविवारी सायंकाळी रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणार ...

मराठा प्रीमियर लीगमध्ये महिलांचाही सामना
जळगाव : मराठा प्रीमियर लीग २०२१ चौथ्या पर्वाचा समारोप सागर पार्क रविवारी सायंकाळी रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत शनिवारी प्रथमच दोन महिला संघांमध्ये सामना खेळवण्यात आला.
मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलल्या मराठा प्रीमियर लीगच्या समारोपप्रसंगी ॲड. उज्ज्वल निकम, आमदार चंद्रकांत पाटील, माजी पंचायत समिती सभापती करण खलाटे, डी.डी. बच्छाव, मनोज पाटील, प्रमोद पाटील,बाळासाहेब सूर्यवंशी,श्रीराम पाटील उपस्थित राहतील. उद्या अंतिम सामना कार्यक्रमच्या समारोपानंतर खेळवण्यात येणार आहे. यंदा प्रथमच महिलाचा माँ साहेब जिजाऊ संघ व माँ भवानी देखील स्पर्धेत सहभागी झाला होता.
शनिवारी माँ भटाई संघाने विजय मिळवला. त्यात भरत कर्डिले हा सामनावीर ठरला.