चोपडय़ात रस्ते, गटारींसाठी महिलांचा मोर्चा
By Admin | Updated: July 13, 2017 17:48 IST2017-07-13T17:48:37+5:302017-07-13T17:48:37+5:30
साने गुरुजी नगर, पवार नगरातील महिलांनी दिले मुख्याधिका:यांना दिले निवेदन

चोपडय़ात रस्ते, गटारींसाठी महिलांचा मोर्चा
ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.13 - यावल रस्त्यालगत असलेल्या पवार नगर, साने गुरुजी नगर, राधाकृष्ण नगर भागत रस्ते व गटारी या मुलभूत सुविधा मिळावा यासाठी महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा आणून मुख्याधिकारी बबन तडवी यांना निवेदन दिले.
यावल रस्तालगत असलेले पवार नगर परिसरात मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गुरुवारी या परिसरातील महिलांनी नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांना भेटण्यासाठी मोर्चा आणला होता. परंतु नगराध्यक्षा नसल्याने त्यांनी आपला मोर्चा मुख्याधिकारी बबन तडवी यांचा कार्यालयाकडे वळविला. मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे महिलांनी समस्यांचा पाढा वाचला. महिलांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले .