२१ रोजी महिला लोकशाही दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:16+5:302021-06-18T04:13:16+5:30

जळगाव : पीडित महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, यासाठी महिला लोकशाही ...

Women's Democracy Day on the 21st | २१ रोजी महिला लोकशाही दिन

२१ रोजी महिला लोकशाही दिन

जळगाव : पीडित महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, आणि

त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, यासाठी महिला

लोकशाही दिन २१ जून रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेत

ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. ज्यांना तक्रार द्यायची आहे. त्यांनी

तहसील कार्यालयाच्या इमेलवर तक्रार करावी, असे आवाहन महिला व बालविकास

अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

बार्टीतर्फे वृक्षारोपण

जळगाव : शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या

माध्यमातून राज्यात ५ ते २० जून हा वृक्षारोपण पंधरवडा साजरा केला जात

आहे. या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते

तर जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील

यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी

अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव,

तालुका समतादूत सरला गाढे, सविता चिमकर, कल्पना बेलसरे उपस्थित होते.

Web Title: Women's Democracy Day on the 21st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.