महिला महाविद्यालयात डॉ. किसन पाटील यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST2021-03-04T04:30:01+5:302021-03-04T04:30:01+5:30
बेकायदा रिक्षा थांबा बंद करण्याची मागणी जळगाव : अजिंठा चौफुलीवर कुठलाही अधिकृत रिक्षा थांबा नसताना, दररोज चौफुलीवर रस्त्याच्या कडेला ...

महिला महाविद्यालयात डॉ. किसन पाटील यांना श्रद्धांजली
बेकायदा रिक्षा थांबा बंद करण्याची मागणी
जळगाव : अजिंठा चौफुलीवर कुठलाही अधिकृत रिक्षा थांबा नसताना, दररोज चौफुलीवर रस्त्याच्या कडेला ४० ते ५० रिक्षा बेकायेदा उभ्या राहत आहेत. यामुळे रहदारीला त्रास होत असून, अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी वाद घडण्याचेही प्रकार घडत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने तत्काळ येथील रिक्षा थांबा बंद करण्याची मागणी मुकेश पवार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
सरकते जिने सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे रेल्वे स्टेशनवरील सरकते जिने वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे वयोवृद्ध व दिव्यांग प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच येथील रॅम्पचे काम पूर्ण होऊनही, सुरू करण्यात आलेले नाहीत. तरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ सरकते जिने सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
भजे गल्लीत पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : मनपा प्रशासनाने नवीन बसस्थानकाला लागून असलेल्या भजे गल्लीत गेल्या आठवड्यात अतिक्रमण मोहीम राबवून, सर्व दुकाने व हातगाड्या हटविल्या होत्या. मात्र, मनपाची कारवाई थंडावल्याने, या ठिकाणी पुन्हा व्यावसायिकांचे अतिक्रमण थाटायला सुरुवात झाली आहे. यामुळे दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी उद्भवत आहे.