वरणगावात दरोडेखोरांच्या हल्यात महिला जखमी
By Admin | Updated: July 12, 2017 12:56 IST2017-07-12T12:56:22+5:302017-07-12T12:56:22+5:30
पहाटे चार वाजेच्या सुमारास भोगावतीनदी काठावरील सार्वजनिक शौचालयात ही घटना घडली.

वरणगावात दरोडेखोरांच्या हल्यात महिला जखमी
आ नलाईन लोकमतवरणगाव, जि. जळगाव, दि. ११ - भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील वंजारी वाड्यातील मंगला मोहोड (देशमुख) ही महिला दरोडेखोराच्या हल्यात गंभीर जखमी झाली. पहाटे चार वाजेच्या सुमारास भोगावतीनदी काठावरील सार्वजनिक शौचालयात ही घटना घडली.मंगला मोहोड पहाटे चार वाजेच्या सुमारास प्रांतविधीसाठी गेल्या असता शौचालय परीसरात दरोड्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांनी महिलेने ओरडू नये म्हणून तिच्यावर हल्ला केला. गळ्यावर चाकूने वार केल्याने २२ टाके पडले आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.