शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

संकटकाळात महिलांना मिळणार तात्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:49 IST

निर्भया व दामिनी पथकाची पुनर्रचना

सुनील पाटील जळगाव : गेल्या काही दिवसात देशभरात महिला व तरुणींसोबत घडत असलेल्या दुर्देवी घटनांच्या पार्श्वभूमीवर आता महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी नवीन वर्षापासून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तात्काळ मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यासह निर्भया व दामिनी पथकाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याशिवाय पोलीस दलातर्फे ‘बडी कॉप’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरु आहे. यासाठी नियंत्रण कक्षातून २४ तास सेवा दिली जाणार आहे.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणून हेल्पलाईन मोबाइल क्रमांक व जिल्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन / तात्काळ सेवेकरिता मोबाइल क्रमांक व व्हाट्सअप क्रमांक पोलीस नियंत्रण कक्ष जळगाव येथे कार्यान्वित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखादे गैरकृत्य किंवा चुकीचे काम होत असेल तर अशावेळी लोकांनी मोबाईलमध्ये फोटो काढून तो नियंत्रण कक्षात पाठवायचा आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणून महिला पोलिसांचे निर्भया पथक, दामिनी पथक तात्काळ धावून येईल. या पथकासाठी स्वतंत्र वाहन असून त्यात वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. यातून महिलांविरुध्द अत्याचाराचे गुन्हे घडतात. सार्वजनिक ठिकाणी, प्रवासातही तरूणी व महिलांना छेडछाड, लंगटपणा आदी अनुभव येत असतात.नोकरी, कामाच्याठिकाणीही अशा प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती वादातून महिलांवरील होणारे अत्याचारही होत असतात. अशा ठिकाणच्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक व दामिनी पथक धावून येईल.शहरातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान गस्त घालणार आहे. पोलिसांना विद्यार्थिनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाणार आहे.पोलीस काका - पोलीस दीदी योजनाशाळा तसेच महाविद्यालयात घडणाºया विविध गुन्हेगारी घटनांवर ( रॅगिंग , अंमली पदार्थ सेव्हन , सायबर गुन्हे , मुलींची छेडखानी इत्यादी )वेळेवर नियंत्रण पोलीस व विद्यार्थी नाते तयार करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर ‘पोलीस काका,पोलीस दीदी’ योजना ही योजना राबविली जात आहे .अधिकारी देतील शाळा, महाविद्यालयांना भेटीप्रत्येक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे त्या त्या पोलीस ठाण्याचे अंतर्गत शाळा ,महाविद्यालय यांना दररोज भेट देऊन प्राचार्य, मुख्याध्यापक,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याशी सुरक्षिततेसाठी चर्चा करणार आहेत .‘बडी कॉप’ ही संकल्पनापोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.ज्या दुर्देवी घटनांमध्ये महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून विशेषत: वेगवेगळ्या कंपन्या, आयटी हब, जेथे महिला रात्री उशिरापर्यंत काम, नोकरी करतात अशा ठिकाणच्या महिलांना सुरक्षेचे भावना निर्माण करण्यासाठी ‘बडी कॉप’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर २४ तास ही सुविधा प्रदान केली जाणार आहे.- डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव