शेतमजूर महिलांना ट्रकने चिरडले, दोघींचा चेंदामेंदा
By Admin | Updated: May 19, 2017 13:04 IST2017-05-19T13:04:05+5:302017-05-19T13:04:05+5:30
दोन्ही महिला जागीच ठार झाल्या़ तर ट्रक चालक फरार

शेतमजूर महिलांना ट्रकने चिरडले, दोघींचा चेंदामेंदा
ऑनलाइन लोकमत
सोनगीर, जि. धुळे, दि. 19 - मुंबई- आग्रा महामार्गावरील सोनगीर शिवारात शुक्रवारी पहाटे भरधाव ट्रकने शेतात पायी जाणा:या दोन शेतमजूर महिलांना चिरडल़े त्यात दोन्ही महिला जागीच ठार झाल्या़ तर ट्रक चालक फरार असून त्याच्या सहका:याला पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
भागाबाई आखाडू भील (वय 65) व इंदुबाई तुळशीराम भील (वय 62) रा़ सोनगीर ता़ धुळे अशी दोघा महिलांची नावे आहेत़ त्या शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शेतात गवताच्या गाठी घेण्यासाठी जात असताना त्यांना एका हॉटेल समोर शिरपूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणा:या ट्रकने (क्ऱ एन पी 09 एच एच 861) मागून धडक देत चिरडल़े दोघ महिलांचा अक्षरश: चेंदा मेदा झाला होता़ अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला लोखंडी कठडय़ांना जाऊन धडकला. यात ट्रकचे पुढील चाक निखळले होते.
दोघा महिलांचे सोनगीर ग्रामीण रूग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ किरणकुमार नेकवाडे यांनी शवविच्छेदन केल़े दोघेही महिलांची परिस्थिती गरिबीची होती़ त्या रोज सकाळी गवत जमा करून ते गावात विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या़