महिलांनी आपले कौशल्य ओळखून पुढे यायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:11+5:302021-07-22T04:12:11+5:30

आधुनिक महिलांना मेकअप व हेअरस्टाईलविषयी अधिक माहिती मिळावी, या पार्श्वभूमीवर शहरातील अन्नपूर्णा रेसिडेन्सी येथे शनिवार व रविवार अशा दोन ...

Women should come forward recognizing their skills | महिलांनी आपले कौशल्य ओळखून पुढे यायला हवे

महिलांनी आपले कौशल्य ओळखून पुढे यायला हवे

आधुनिक महिलांना मेकअप व हेअरस्टाईलविषयी अधिक माहिती मिळावी, या पार्श्वभूमीवर शहरातील अन्नपूर्णा रेसिडेन्सी येथे शनिवार व रविवार अशा दोन दिवसांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विजय वाघ व रश्मी लोडाया यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद या उपस्थित होत्या. या वर्कशॉपमध्ये एकूण वीस महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांनी थ्रीडी मेकअप, हेअरस्टाईल कशा प्रकारे केले जाते, हे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलांनी खास करून ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःतील गुण ओळखून पुढे यायला हवे आणि त्याच क्षेत्रात यश मिळवून स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन अलका गोविंद यांनी यावेळी सांगितले.

सहभागी झालेल्या मुली वा महिलांनी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने मेकअप व हेअरस्टाईल शिकविल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद, विजय वाघ, रश्मी लोडाया उपस्थित होते.

Web Title: Women should come forward recognizing their skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.