बिबटय़ाच्या हल्ल्यात महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 13:16 IST2017-08-16T13:15:47+5:302017-08-16T13:16:48+5:30
भीती : शेळी केली फस्त

बिबटय़ाच्या हल्ल्यात महिला जखमी
ठळक मुद्देशेतात काम करणा:या महिलेवर बिबटय़ाने हल्ला महिलांनी आरडाओरड केल्याने बिबटय़ाने पळ काढला
ऑनलाईन लोकमत
काकडणे, जि. जळगाव, दि. 16 - चाळीसगाव तालुक्यातील काकडणे येथे शेतात काम करणा:या विजयाबाई भिका वाघ (60) या शेतात काम करणा:या महिलेवर बिबटय़ाने हल्ला केल्याने ती जखमी झाली. ही घटना 15 रोजी दुपारी घडली.
विजयाबाई वाघ यांच्यासह पाच ते सहा महिला शेतात काम करीत असताना अचानक विजयाबाई यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केला. त्यावेळी महिलांनी आरडाओरड केल्याने बिबटय़ाने पळ काढला. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या पायावर जखम झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर संध्याकाळी विजय जगन्नाथ पाटील यांच्या शेतात पुन्हा बिबटय़ाने हल्ला करीत एक शेळी फस्त केली. यामुळे परिसरात भीती पसरली आहे.