महिला व वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:41 IST2019-07-12T22:41:00+5:302019-07-12T22:41:56+5:30
पारोळा तालुक्यातील दोन घटना

महिला व वृद्धाची आत्महत्या
पारोळा : तालुक्यातील दोन घटनांमध्ये महिला व वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिरसमनी येथील उषाबाई रामकृष्ण कुंभार (वय ३८) यांनी १२ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शिवाजी कुंभार यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. कॉ. किशोर पाटील करीत आहे
दुसऱ्या घटनेत आडगाव येथील दशरथ चिंधा पाटील (वय ६३) यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पारोळा पोलिसात भाईदास पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. कॉ. आशिष चौधरी करीत आहे.
या घटनांमागील कारण मात्र समजू शकले नाही.