महिलेचे उपोषण बेकायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:15+5:302021-09-03T04:18:15+5:30
पाचोरा : कोरोनाकाळातील संशयित व बाधित मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कारासंबंधी पालिकेने दिलेला ठेका नियमानुसारच आहे. यात महिलेचे उपोषण बेकायदेशीर असल्याचे ...

महिलेचे उपोषण बेकायदेशीर
पाचोरा : कोरोनाकाळातील संशयित व बाधित मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कारासंबंधी पालिकेने दिलेला ठेका नियमानुसारच आहे. यात महिलेचे उपोषण बेकायदेशीर असल्याचे पाचोरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
पाचोरा नगरपालिकेने कोरोनाकाळातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका दिलेला होता. त्यासंदर्भात पाचोरा तहसील कार्यालयासमोर सरिता कर्तार चांगरे व सूरज भैरू यांनी वेगवेगळे उपोषण केले.
नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या रु. ७०००/- दराची निविदा सूरज भैरू याची होती. त्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सरिता चांगरे ह्या महिलेचा कुठेही संबंध नाही. हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे पत्र पोलिसांना २ रोजीच देण्यात आले आहे.
महर्षी वाल्मीकी संस्थेने कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा ठेका रु ७०००/- प्रमाणेच घेतला होता. यामुळे आता कमी रकमेचा ठेका मिळण्यासाठी दावा करून दिशाभूल करीत आहेत. पूर्वी पालिकेकडून जास्तीच्या दराने बिले घेतली आहेत. त्याची वसुली पालिकेकडून होऊ शकते, असेही आरोग्य निरीक्षक यांनी स्पष्ट केले आहे.