महिलेची भुसावळ- जळगाव बसमध्येच प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST2021-08-15T04:19:18+5:302021-08-15T04:19:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बसमध्ये असतानाच एका महिलेला प्रसुती कळा सुरू होऊन बसमध्येच महिलेने एका मुलीला जन्म दिल्याची ...

Woman's delivery in Bhusawal-Jalgaon bus | महिलेची भुसावळ- जळगाव बसमध्येच प्रसुती

महिलेची भुसावळ- जळगाव बसमध्येच प्रसुती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बसमध्ये असतानाच एका महिलेला प्रसुती कळा सुरू होऊन बसमध्येच महिलेने एका मुलीला जन्म दिल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली. बसचालक व वाहकांनी तातडीने बस थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणली होती. यानंतर डॉक्टरांनी तातडीने पुढील उपचार केले.

यावल तालुक्यातील चिखली येथील रहिवासी सोनाली प्रवीण पाटील या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना दुपारी त्रास सुरू झाल्यानंतर त्या चिखली येथून यायला निघाल्या. भुसावळ येथून जळगाव कडे येत असताना नशिराबाद जवळ त्यांना त्रास वाढला. त्यातच दोन महिलांनी त्यांना सावरले. यानंतर चालक व वाहकांनी बस थेट जिल्हा रुग्णालयात आणली. यावेळी डॉ.हेमंत पाटील यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत पुढील उपचार केले व महिला नंतर सहा नंबर कक्षात दाखल करण्यात आले. महिलेने बसमध्येच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यांना एक चार वर्षाची मुलगी असून सोनाली यांचे वडिल अशोक मराठे हे त्यांच्या सोबत आहेत.

Web Title: Woman's delivery in Bhusawal-Jalgaon bus