गिरड येथे घराचे छत कोसळून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:23+5:302021-08-26T04:19:23+5:30
फोटो गिरड, ता. भडगाव : पावसामुळे जीर्ण झालेले मातीचे छत कोसळून त्याखाली दाबल्याने पत्नी शोभाबाई वसंत पाटील (६०) ...

गिरड येथे घराचे छत कोसळून महिला ठार
फोटो
गिरड, ता. भडगाव : पावसामुळे जीर्ण झालेले मातीचे छत कोसळून त्याखाली दाबल्याने पत्नी शोभाबाई वसंत पाटील (६०) ही महिला जागीच ठार झाल्याची घटना गिरड, ता. भडगाव येथे बुधवारी पहाटे घडली. यात पती जखमी झाला आहे.
गिरड येथे वसंत पोपट पाटील (७०) हे पत्नी शोभाबाई यांच्यासह वास्तव्यास आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी सतत पाऊस पडल्याने घराचे मातीचे छत जीर्ण झाले होते. बुधवारी पहाटे पाटील दांपत्य झोपेत असताना त्यांच्या अंगावर छत कोसळले. यात शोभाबाई या जागीच ठार झाल्या, पती वसंत पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शोभाबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा तलाठी आर. जी. पवार यांनी पंचनामा केला आहे. वारसांना शासनाच्या वतीने मदत दिली जावी, अशी मागणी आहे.